श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्तव्यवस्थेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनाही मिळणार शैक्षणिक शुल्क परतावा

अशोक मुरुमकर
Tuesday, 6 October 2020

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पाल्याच्या २०१९- २० या वर्षाचे शैक्षणिक शुल्क परतावा करण्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या विधि व न्याय विभागाने आदेश दिला आहे. यासाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च करण्यास मान्यता दिली आहे.

अहमदनगर : शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पाल्याच्या २०१९- २० या वर्षाचे शैक्षणिक शुल्क परतावा करण्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या विधि व न्याय विभागाने आदेश दिला आहे. यासाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च करण्यास मान्यता दिली आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
शिर्डी श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्तव्यवस्थेच्या आस्थापनेवरील काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक फिचा परतवा देण्यात येतो. त्याच धर्तीवर आता कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक शुल्काचा परतवा देण्यात येणार आहे. 2019- 20 या शैक्षणिक वर्षासाठी श्री साईबाबा संस्थांच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक फिचा परतावा करण्यास व त्यासाठी सुमारे 50 लाख खर्चास सरकारने मान्यता दिली आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यां शैक्षणिक फिच्या परताव्याबाबत सरकारच्या विधी व न्याय विभागाने आदेश काढला आहे. 

हेही वाचा : शेतमजूर संघटनेकडून श्रीरामपूर तालुक्यात गरजुंसाठी सायकलचे वाटप
यामध्ये म्हटले की, कंत्राटी कर्मचाऱ्यांना इतर कोणत्याही सेवांविषयक किंवा आस्थापनाविषयक लाभ अथवा अन्य सुविधांसाठी संस्थांवर दावा करता येणार नाही. यासाठी श्री साईबाबा संस्थानद्वारे सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून लेखी हमीपत्र घ्यावे, असेही या आदेशात म्हटलं आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था यांनी या आदेशाची अंमलबजावणी करून झालेल्या खर्चाच्या पत्रासह अहवाल सादर करण्याचेही यामध्ये म्हटलं आहे. सरकारच्या विधी व न्याय विभागाच्या कार्यासन अधिकारी सुनीता साळुंके यांनी हा आदेश काढला आहे. याची प्रत श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्था शिर्डीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The order Refund tuition fees to children of contract employees from shri saibaba trust