esakal | शेतकऱ्याच्या दुधाचा दर २० रूपये मग पॅकिंगचे ५० रूपयांना कसे?
sakal

बोलून बातमी शोधा

milk

शेतकऱ्याच्या दुधाचा दर २० रूपये मग पॅकिंगचे ५० रूपयांना कसे?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पोहेगाव (कोपरगाव): शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यावसाय मोठ्याप्रमाणात केला जातो. तर अनेक शेतक-यांनी मुख्य व्यवसाय म्हणुन दुग्धव्यावसायाला पंसती दिली. मात्र गेल्या काही दिवसांपासून चारा अन खाद्याचे पैसेच फिटेनासे झाले आहेत.

दुधाला मिळणा-या भावाने शेतक-यांचे संपुर्ण अर्थिक गणित कोलमडुन पडले आहे. सध्या एक लिटरला 20 ते 22 रुपये भाव मिळत आहे. मात्र, पॅकिंग दूध आजही 45 ते 50 रुपये लिटरने विकले जात आहे. खरा उत्पादकास आजही नफा मिळत नाही. (Packing milk at the rate of Rs. 50 per liter)

पशुखाद्याचे भाव दररोज वाढत आहे. चारा परवडत नाही. जनावरांच्या औषधाच्या किमती मोठ्या प्रमाणात आहे. जनावरांचे आजार, चारा, पाणी, खाद्य या सगळ्याचा हिशेब करता कमीत कमी दुधाला 30 ते 35 रुपये लिटरला भाव मिळणे अपेक्षित आहे. तरच दोन पैसे शेतक-याच्या हातात पडू शकतात. स्वताची मजुरी निघू शकते. वीस रुपये भावाने जर दुध विकले गेले तर हा व्यवसाय मोडकळीस येण्यास वेळ लागणार नाही.(Packing milk at the rate of Rs. 50 per liter)

हेही वाचा: ५६व्या वर्षी दिली परीक्षा, पीएसआय बनून केली स्वप्नपूर्ती

दुधाचे भाव उतरले तर मग शहरात विकले जाणारे पॅंकिग दुधाचे भाव का कमी केले जात नाही अशा प्रश्न दुधउत्पादकांना पडत आहे. प्रक्रिया करुन विक्री करण्यापर्यंत एक लिटरला खरच 25 रुपये खर्च येतो का असा प्रश्न आता दुधउत्पादक शेतकरी विचारु लागले आहेत.

अगोदरच कोरोनाने शेतीमालाला भाव नाही जोडधंदा म्हणून करत असलेल्या दुधालाही भाव नाही मग शेतक-याने आपली गुजरान तरी कशी करावी. पशुपालकांची दुधाला फार भावाची अपेक्षा नाही. मात्र, चारा, खाद्य,औषधे यांचा खर्च निघुन मजुरी तरी फिटली पाहिजे ही माफक अपेक्षा आहे. मात्र, आज शेतक-यांना कोणी वाली राहिले आहे की नाही. हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. सरकार कोणतेही असो मात्र दुधउत्पादक शेतक-यांकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते हे मात्र नक्की.(Packing milk at the rate of Rs. 50 per liter)