esakal | पंकजा मुंडे पक्षामध्ये कोणावरही नाराज नाहीत - चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant patil

पंकजा मुंडे कोणावरही नाराज नाहीत - चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

अहमदनगर : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचे वक्तव्य केले होते. या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता, चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘पंकजा मुंडे या पक्षामध्ये कोणावरही नाराज नाहीत. खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले होते. पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली आहे. असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नगर येथे (ता.23) केले. पाटील शुक्रवारी( ता.23 ) नगर दौऱ्यावर आले असता त्यांनी माजी केंद्रीय मंत्री स्व. दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Pankaja-Munde-not-upset-with-anyone-said-chandrakant-patil-jpd93)

बैठकांचे सत्र; पक्षबांधणी करण्याचे आदेश

चंद्रकांत पाटील यांनी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या समवेत शहरातील सर्व भाजप मंडलांच्या बैठका घेतल्या. तसेच पक्षबांधणी करण्याचे आदेश दिले. यावेळी विभाग संघटनमंत्री रवी अनासपुरे, नगर जिल्ह्याचे प्रभारी मनोज पांगारकर आदी उपस्थित होते. सायंकाळी महापालिकेतील विरोधी पक्षनेता ठरविण्यासाठी ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी पाटील यांनी महापालिकेतील सर्व नगरसेवकांची बैठक घेतली.

मुख्यमंत्र्यांवर घणाघात

निसर्ग, तौक्ते वादळ व अतिवृष्टीची मदत आपत्तिग्रस्तांना मिळालेली नाही. मदत दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दादागिरी करून सांगत आहेत. राज्यात अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री ठाकरे घराबाहेर पडत नाहीत. आपत्तिग्रस्तांना राज्य सरकारचा मदतीचा हात मिळालेला नाही, असा घणाघाती आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला. ते म्हणाले, की कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चिपळून परिसरात महापूर आला आहे. अनेक गावांना पाण्याने वेढा घातला आहे. तेथील अवस्था भीषण आहे. हातात हात घालून मदत केली पाहिजे. मात्र, मदत करायला कोणीच पुढे आलेले दिसत नाहीत. पूरपरिस्थितीवरून राजकीय आखाडा आम्ही करत नाही. आधी पूरग्रस्तांना बाहेर काढा. महापुरात कुणी राजकारण करायला बसले नाही. संबंधित जिल्ह्यांतील पालकमंत्र्यांना आदेश द्या. प्रशासनाला आदेश द्या. तेथे एकही मंत्री जायला तयार नाही.

हेही वाचा: राहुरीत पोलिसांच्या तडकाफडकी बदल्या; 8 घरफोड्या भोवल्या

आम्ही चार लाख ७३ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले होते

दोन वर्षांपूर्वी सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये पूर आला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व मी महसूलमंत्री होतो. त्यावेळी आम्ही जिवापाड परिश्रम केले तरी काँग्रेसने टीका केली. त्यावेळी आम्ही चार लाख ७३ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले. जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था केली.

हेही वाचा: अकोल्यातील ५ जलाशये भरली; धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर कायम

loading image
go to top