esakal | पालकांनो मुलांना इंग्रजी शाळेत मिळतो प्रवेश, फक्त नावनोंदणी करा

बोलून बातमी शोधा

Parents get admission in English school for children, just enroll}

कालपासून (बुधवार) नोंदणीला सुरवात झाली आहे. 21 मार्चपर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे.

पालकांनो मुलांना इंग्रजी शाळेत मिळतो प्रवेश, फक्त नावनोंदणी करा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्यानुसार गरीब कुटुंबांतील विद्यार्थ्यांना पहिलीच्या वर्गात मोफत प्रवेश मिळावा, यासाठी नोंदणीला सुरवात झाली आहे. नगर जिल्ह्यात याअंतर्गत 402 शाळांमध्ये तीन हजार 13 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. 

गरीब कुटुंबांतील पाल्यांना खासगी शाळांत मोफत प्रवेश मिळावा, यासाठी बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्यानुसार 25 टक्के जागा राखीव ठेवून तेथे मोफत प्रवेश दिला जातो. त्यासाठी शिक्षण विभागाकडून पहिलीच्या प्रवेशासाठी नोंदणी करून नंतर विद्यार्थ्यांची सोडत काढली जाते. यंदा प्रवेशासाठी पालकांनी नोंदणी करावी, असे आवाहन केले जात आहे. 

नोंदणी झाली सुरू

कालपासून (बुधवार) नोंदणीला सुरवात झाली आहे. 21 मार्चपर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे. नगर जिल्ह्यात 402 शाळा पात्र असून, पहिलीसाठी एकूण 11 हजार 883 व पूर्वप्राथमिकसाठी 40 जागा आहेत. त्यांतील 25 टक्के, म्हणजे तीन हजार 13 जागा राखीव ठेवल्या आहेत. प्रवेशासाठीच्या नोंदणीला दिव्यांग, उत्पन्नाचा, जातीचा, जन्माचा दाखला आवश्‍यक आहे.

यांना आहे सवलत

विधवा, घटस्फोटित महिलांची बालके, अनाथ बालके यांना प्रवेशात प्राधान्य असेल. ऑनलाइन नोंदणी करतानाच कागदपत्रे देणे बंधनकारक आहे. एका पालकाला पर्याय म्हणून आपल्या भागातील दहा शाळांची नावे टाकता येतील. जास्तीत जास्त पालकांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे. 
 
तालुकानिहाय प्रवेश संख्या 
अकोले ः 95, जामखेड ः 43, कोपरगाव ः 242, कर्जत ः 95, नगर तालुका ः 310, नेवासे ः 232, पारनेर ः 154, पाथर्डी ः 147, राहुरी ः 285, राहता ः384, शेवगाव ः 195, संगमनेर ः 281, श्रीगोंदे ः 91, श्रीरामपूर ः 203, नगर शहर ः 246