पारनेर : तिकिटाचे पैसे, मशिन घेऊन कंडक्टर पसार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST-Bus

पारनेर : तिकिटाचे पैसे, मशिन घेऊन कंडक्टर पसार

पारनेर : पारनेर एसटी महामंडळाच्या आगारात कामाला असलेल्या एसटीच्या वाहकाने प्रवासी तिकिटाची जमा झालेली ३१ हजार ५९४ रुपयांची रक्कम, तसेच तिकीट काढण्यासाठी असलेल्या २४ हजार ४२० रुपयांच्या ईटीआयएम मशिन घेऊन पोबारा केला. याबाबत पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी मनोज विठ्ठल वैरागळ (रा. शांतिनगर, तारकपूर, नगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बसवाहकाचे नाव आहे. वैरागळ हा पारनेर आगारात वाहक म्हणून काम करतो. तो कामावर असताना १७ जुलै रोजी दिवसभराची प्रवासी वाहतूक तिकिटाची जमा झालेली ३१ हजार ५९४ रुपयांची रक्कम, तसेच २४ हजार ४२० रुपयांची तिकीट काढण्यासाठी वापरण्यात येणारी ईटीआयएम मशिन त्याने डेपोत जमा न करता ते घेऊन तो फरार झाला आहे.

गेल्या आठवडाभरात तो पुन्हा कामावर न आल्याने, तसेच तिकिटाची रक्कम व मशिन जमा न केल्याने अखेर मंगळवारी (ता. २६) पारनेर बस आगाराचे वाहतूक निरीक्षक रावसाहेब ताराचंद करपे यांनी पारनेर पोलिस ठाण्यात वैरगळाविरुद्ध फिर्याद दिली. या फिर्यादीवरून वैरागळविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैरागळ याच्यावर फेब्रुवारी २०२२ मध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान नगर शहरात एसटी बसवर दगडफेक केल्याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यातसुद्धा एक गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पारनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप तपास करत आहेत.

Web Title: Parner Conductor Machine Ticket Money Pass

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..