
Empty classrooms in Parner schools reflect the ongoing teacher shortage affecting student education and school performance.
Sakal
-मार्तंड बुचुडे
पारनेर: तालुक्यात जिल्हा परिषदेच्या काही प्राथामिक शाळांत गरजेपेक्षा शिक्षकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड होत आहे. त्यात यावर्षी निम्मे शैक्षणिक वर्ष संपत आल्यानंतर शिक्षकांच्या नुकत्याच बदल्या झाल्या आहेत. अनेक ठिकाणी शिक्षक तसेच केंद्र प्रमुख कमी असल्याने त्या शिक्षकांवर कामाचा बोजा पडत आहे. त्यातच अनेकांना निवडणुकीचे, तर काहींना इतर कामे दिल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे.