esakal | पारनेरमध्ये हंगा नदीला पूर, एकजण गेला वाहून
sakal

बोलून बातमी शोधा

In Parner, the Hanga River flooded, carrying one

या नदीला पारनेर लोणी हंगे व मुंगशी या शिवारातील पाणी येते. आज झालेल्या ढगफुटी सद्रुष्य  पाऊसामुळे हंगा नदीला मोठा पूर आला होता.

पारनेरमध्ये हंगा नदीला पूर, एकजण गेला वाहून

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर ः पारनेर, जामगाव, लोणी हवेली, मुंगशी तसेच हंगे शिवारात जोरदार पाऊस झाल्याने हंगा नदीला अतीशय मोठा पूर आला.

गेली अनेक वर्षात एवढा मोठा लोकांनी पाहिला नव्हता. या पुरात मुंगशी येथील एकजण वाहून गेल्याची चर्चा आहे. मात्र, रात्र झाल्याने व अंधार पडला असल्याने तसेच नदीला अद्यापही खूप पाणी आहे त्यामुळे संबधीताचा शोध घेणे कठीण झाले आहे.

या नदीला पारनेर लोणी हंगे व मुंगशी या शिवारातील पाणी येते. आज झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे हंगा नदीला मोठा पूर आला होता. या पूरात हंगे ते मुंगशी या रस्त्यावर  मुंगशी गावा नजिक असलेल्या पुलावर पुराचे खूप पाणी होते.

मुंगशी येथील एक जण  हंगे येथून आपल्या घरी  दुचाकीवरून जात असताना ही घटणा घडली.  त्या वेळ  पुलावर चांगलेच पाणी वाहत होते. त्या पाण्यात संबधीत व्यक्तीने  दुचाकी घातली व तो वाहून गेला असे काही प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले. संबंधिताची दुचाकीही पुलाच्या खालच्या बाजूला अडकलेल्या अवस्थेत आहे. मात्र संबधीत व्यक्तीचा शोध लागला नाही. 

ही माहिती समजल्यानंतर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न रात्री सुप्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल थोरात व ग्रामस्थांनी  शोध घेण्याचा प्रसयत्न केला मात्र शोध लागला नाही.

रात्र झाल्याने अंधार पडला तसेच नदीला अद्यापही मोठा पूर असल्याने शोध घेणे अवघड झाले आहे गेली अनेक वर्षात पहिल्यांदा एवढा मोठा पूर या नदीला आला आहे. त्यामुळे पूर पहाण्यासाठी लोकांनी नदीकिनारी एकच गर्दी केली होती.

हंगे येथील पुलास तर वाघुंडे येथील दत्त मंदीरास पाण्याने वेढा दिला होता. गेली अनेक वर्षात दत्त मंदीरात पाणी शिरले नव्हते आज  थेट मंदिरात पाणी घुसले होते.

संपादन - अशोक निंबाळकर