
पारनेर : तालुक्यात जनावरांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. गाय, म्हैस या दुभत्या जनावरांसह शेळ्या, मेंढ्या व बैल या सारखी जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना दिवसेंदिवस कठीण होत आहे. मात्र, आहे ती जनावरे सुरक्षित व निरोगी रहावीत, यासाठी शेतकऱ्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. शासनाकडूनही उपाययोजना केल्या जात आहेत. त्याची अंमलबजावणी ग्रामीण भागात होत आहे.