
-मार्तंड बुचुडे
पारनेर : जास्त परतावा देण्याच्या आमिषाला बळी पडून सुपे परिसरातील अनेक नागरिकांनी सुमारे चारशे कोटी रुपये सिसपे कंपनीत गुंतवले. या कंपनीने गाशा गुंडाळला असून, सुमारे चार महिन्यांपासून फक्त आश्वासने देण्याचे काम कंपनीच्या एजंटांनी केले आहे. मात्र, आता पाच ते सहा दिवसांपासून कार्यालयच बंद झाल्याने गुंतवणूकदार चांगलेच धास्तावले आहेत.