

Elderly Woman Killed in Leopard Attack in Parner
Sakal
पारनेर : किन्ही येथे सायंकाळी चार वाजणेच्या सुमारास शेतात काम करत असताना बिबट्याच्या अचानक हल्ला केला या हल्यात भागूबाई विश्वनाथ खोडदे (वय ७०, रा. किन्ही, ता. पारनेर) या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. या बाबत माहिती अशी की, भागूबाई खोडदे ह्या गावाजवळील साकुरे वस्तीवर आपल्या शेतात एकट्याच काम करत होत्या. अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्या वेळी त्यांनी आरडा ओरड केली मात्र जवळपास कोणी नसल्याने त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या जवळ कोणी जाऊ शकले नाही. ट्या मुळे या हल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. थोड्या अंतरावर असलेल्या ग्रामस्थांनी आरडाओरड केल्यावर बिबट्या पळून गेला.