
बाजार समितीतर्फे या वर्षासाठी आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मूग, उडीद खरेदी केला जाणार आहे. यात सरकारने मुगाला सात हजार 196 रुपये, तर उडदाला सहा हजार रुपये प्रतिक्विंटल आधारभूत किंमत ठरविली आहे.
पारनेर ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत "नाफेड'च्या माध्यमातून मूग, उडीद खरेदीला मंजुरी मिळाली आहे. उत्पादक शेतकऱ्यांनी उद्यापासून (ता. 15) मूग, उडीद विक्रीसाठी येथील बाजार समितीत ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी केले.
येथील बाजार समितीतर्फे या वर्षासाठी आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मूग, उडीद खरेदी केला जाणार आहे. यात सरकारने मुगाला सात हजार 196 रुपये, तर उडदाला सहा हजार रुपये प्रतिक्विंटल आधारभूत किंमत ठरविली आहे.
हेही वाचा - या गावात होते दैत्याची पूजा, हनुमंताचं आहे वावडं
शेतकऱ्यांनी आपला माल वाळवून व स्वच्छ करून आणावा. मालाच्या ऑनलाइन नोंदीसाठी तलाठ्यांच्या स्वाक्षरीचा सातबारा उतारा, आठ अ, आधार कार्ड व राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या पासबुकची छायांकित प्रत, मोबाईल सोबत आणावा. नोंदणीनंतर शेतकऱ्यांना "एसएमएस'द्वारे माल खरेदीची तारीख कळविण्यात येईल.
स्वीकारलेल्या मालाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होईल. या योजनेचा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गायकवाड यांनी केले.
संपादन - अशोक निंबाळकर