
पारनेर तालुका सैनिक बॅंकेत अध्यक्ष व त्यांच्या मर्जीतील काही संचालकांनी अनुशेष भरतीच्या निकषांचे उल्लंघन करत नातेवाईकांसह इतरांची नियमबाह्य नोकर भरती केली आहे.
श्रीगोंदे (अहमदनगर) : पारनेर तालुका सैनिक बॅंकेत अध्यक्ष व त्यांच्या मर्जीतील काही संचालकांनी अनुशेष भरतीच्या निकषांचे उल्लंघन करत नातेवाईकांसह इतरांची नियमबाह्य नोकर भरती केली आहे. सदर भरती रदद् करतानाच बॅंकेचे झालेले नुकसान संबंधितांकडून वसुली करण्याची मागणी संचालक सुदाम कोथिंबीरे यांनी केली आहे.
कोथिंबीरे यांनी याबाबत सहकार आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सैनिक बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष व काही संचालक यांच्याशी हात मिळवणी करत नियमबाह्य नातेवाईकांची नोकर भरती केली आहे. ही नोकर भरती करताना अनुशेष भरतीच्या निकषांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे अनुशेष इगतवारीची तपासणी होऊन त्या नियमबाह्य नोकर भरतीला स्थगिती देऊन रदद् करावी.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सदर नोकर नोकरभरती करताना जाती नियमांचे उल्लंघन करण्यात आलेले आहे त्यामुळे बिंदु नियमवाली रजिस्टरची तपासणी व्हावी. स्टाफिंग पॅटर्न मंजूर नसताना भरती करण्यात आली. बँक तोट्यात असताना नोकर भरतीसाठी सहकार आयुक्त, रिझर्व्ह बँकेची परवानगी घेतली नाही. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कायदा 1960,1961 मधील तरतुदीचे पालन केलेले नाही. मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी संचालक मंडळ यांच्याशी संगनमत करून भरती प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने केली नाही.
सेवा योजना कार्यालयाकडुन उमेदवारांची नावे मागितली गेली नाही. शासनाच्या निर्णयानुसार नोकर भरती करताना अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जमाती, विशेष मागास प्रवर्गातील रिक्त जागा भरण्यास प्राधान्य दिले नाही.
बँक ही राज्यस्तरीय असतांना शासनाने नियुक्त केलेली यंत्रनेच्या माध्यमातुन परिक्षा घेण्यात आल्या पाहिजे होत्या मात्र त्या घेण्यात आल्या नाही. वशिल्याचे उमेदवार घेता यावे याची पुरेपुर व्यवस्था मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी केली आहे. आदी आरोप करण्यात आले आहेत.
पत्रकारांशी बोलताना कोथिंबीरे म्हणाले, या सदोष भरती प्रक्रियेचा बँंकांच्या प्रशासनावर अनिष्ठ परिणाम होऊन बँकेवर विश्वास ठेवून गुंतवणूकदारांच्या, ठेवीदारांच्या हितास बाधा पोहोचली आहे. लोकहितासाठी व बँकांचे कामकाज कार्यक्षम चालविण्यासाठी पारदर्शक, नि:पक्ष भरती प्रक्रिया राबविणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे आपनस विनंती करण्यात येते की वरील मुदयाची तपासणी होऊन बेकायदा नोकर भरतीला स्थगिती द्यावी व ती रद्द करावी.
संपादन : अशोक मुरुमकर