बंद घराचे कुलुप तोडून सोन्याच्या दागिन्यांसह ६३ हजाराची चोरी

मार्तंड बुचुडे
Tuesday, 29 September 2020

बंद घराचे कुलूप तोडून संदीप देठे यांच्या टाकळी ढोकेश्वर येथील घरातून रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांसह 63 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

पारनेर (अहमदनगर) : बंद घराचे कुलूप तोडून संदीप देठे यांच्या टाकळी ढोकेश्वर येथील घरातून रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांसह 63 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत पारनेर पोलिस ठाण्यात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
सोमवारी (ता. 28 ) चार ते साडेसात वाजता देठे यांच्या घराचे कुलूप तोडून घरातून 12 हजार रूपये किंमतीचे एक सोन्याचे गंठण, 30 हजार रूपये किंमतीची एक तोळा वजनाची सोन्याच्या मण्याची माळ, 16 ग्रॅम वजनाची 16 हजार रूपये किंमतीची कर्णफुले, तसेच पाच हजार रूपये असा एकूण 63 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद देठे यांनी दिली आहे.

या बाबत बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून फिर्यादीच्या संमतीशिवाय ऐवज चोरून नेल्या बाबतचा गुन्हा पारनेर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एस.के.कदम करत आहेत.  

संपादन : सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Parner taluka, a locked house was broken into and Rs 63 Thousand was stolen along with gold jewelery

Tags
टॉपिकस
Topic Tags: