पारनेर : जमीन मोजणीची हजार प्रकरणे प्रलंबीत

पारनेरमध्ये उपअधीक्षक भूमिअभिलेख पद रिक्त, शेतकऱ्यांची कामे खोळंबली
 जमीन मोजणीची हजार प्रकरणे प्रलंबीत
जमीन मोजणीची हजार प्रकरणे प्रलंबीतsakal

पारनेर: तालुक्यातील एक हजार 395 मोजणी प्रकरणे मोजणी अधिकाऱ्यांअभावी प्रलंबित आहेत. मोजणी कार्यलयातील उपअधीक्षक भूमिअभिलेख हे पद दीड वर्षापासून रिक्त आहे. काही दिवसांपासून श्रीगोंदे येथील अधिकाऱ्यांकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. तर आता नव्याने पुन्हा मागील आठवड्यात नेवासे येथील भाऊसाहेब पवार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपावला आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक मोजणी प्रकरणे प्रलंबित आहेत.

पारनेर तालुका विस्ताराने व क्षेत्रफळाने जिल्ह्यात सर्वाधिक मोठा आहे. सुपे औद्योगिक वसाहत तसेच कुकडी कालवा यामुळे तालुक्यात शेती व जागांचे खरेदी विक्रीचे व्यावहार मोठ्या प्रमाणावर चालतात. शेतकऱ्यांची जमीन मोजणी प्रकरणेही खूप आहेत. अशा स्थीतीत भूमि-अभिलेख कार्यालयातील उप-अधीक्षकासह अनेक कर्मचाऱ्यांच्या जागा अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. त्यामुळे जमीन व जागा मोजणीची एक हजार 395 प्रकरणे प्रलंबित आहेत. अतिरिक्त कार्यभारामुळे संबधित अधिकारी आठ दिवसातून एक किंवा दोन दिवसच येतात. त्यामुळे मोजणीची कामे प्रलंबित आहेत.

तालुक्यात महिण्याकाठी दोनशे प्रकरणे मोजणीसाठी दाखल होतात. मात्र, कर्मच्याऱ्यांच्या कमतरतेमुळे ही प्रकरणे निकाली निघू शकत नाहीत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे महिण्याकाठी फक्त ७० ते ७५ प्रकरणे निकाली निघतात. ज्यांना जागेची किंवा जमीनीची मोजणी करावयाची आहे अशांच्या या कार्यालयात रोज खेटा सुरू आहेत.

मोजणीसाठी एक वर्षापेक्षा अधिककाळ 421, सहा महिणे ते एक वर्ष-354, तीन ते सहा महिणे-357 दोन ते तीन महिणे 75 तर दोन महिण्याच्या आतील 188 प्रकरणे प्रलंबित आहेत.

मोजणीसाठी दाखल प्रकरणावर मोजणी कशी करावयाची यावर फीचा दर ठरलेला असतो. ही फी सरकारी तिजोरीत जमा होते. सरकारला यातून मोठ्या प्रमाणावर महसुल मिळत असूनही संबधीत सरकारी यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष आहे.

इतर कार्यालयातील अधिकारी पारनेर येथे अतिरिक्त पाठवून मोजणी प्रकरणे निकाली काढण्यात येत आहेत. चार महिण्यात 620 मोजणी प्रकरणे निकाली काढली आहेत. या पुढेही अतिरिक्त अधिकारी पाठवून प्रकरणे निकाली काढण्यात येतील. अगामी काळात अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या तर एक नियमित उपअधीक्षकाची नेमणुक करण्याचा माझा प्रयत्न असेल.

- सुनील इंदलकर,जिल्हा अधीक्षक भूमि-अभिलेख

आकडे बोलतात..

१३९५मोजणी साठी प्रलंबित प्रकरणे

६० अत्यंत तातडीची ८४६

अतीतातडीची ३०९

तातडीची १८०

सर्वसाधारणकार्यालयातील रिक्त पदे

उपअधीक्षक भूमअभिलेख १

छानणी लिपीक १

कनिष्ट लिपिक १

सिटी सर्व्हे २

दप्तरबंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com