पारनेरचे सभापती कोरोनामुक्त, मुख्यमंत्र्यांनीही दिला मानसिक आधार

Parner's chairman Shelke Corona recovered from the illness
Parner's chairman Shelke Corona recovered from the illness

पारनेर ः पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांना मागील आठ दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. योग्यवेळी उपचार घेतल्यानंतर ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत.

आजाराच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार शिवाजी कर्डीले , बाबूराव पाचर्णे ,आमदार नीलेश लंके, सुजित झावरे, तहसीलदार ज्योती देवरे, सभापती काशीनाथ दाते, रामदास भोसले यांच्यासह अनेकांनी व तालुक्यातील जनतेने फोनद्वारे मानसिक आधार दिला असल्याचे शेळके यांनी सांगितले.

या आजाराविषयी शेळके म्हणाले, वेळीच उपचार घेतल्याने या आजारावर आपण सहज मात करू शकतो. पंचायत समितीमध्ये नेहमी मला जनतेच्या कामासाठी यावे लागत होते. मी भरपूर काळजीही घेतली तरीसुद्धा मला या आजाराची लागण झाली. माझ्याबरोबर तालुका दूध संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे यांनाही लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

आम्ही सुपे येथे तात्काळ उपचार घेतले. त्यामुळे आजाराचा जास्त त्रास झाला नाही. आज आम्ही दोघेही ठणठणीत बरे झाले आहोत. या आजारात औषधोपचार बरोबरच रूग्णाने आपले मानसिक संतुलन सांभाळणे व घरातील मंडळी तसेच मित्रांचा अधाराची गरज सर्वात महत्वाची आहे. आजाराची लक्षणे जाणवल्यावर तात्काळ टेस्ट करून उपचार घेणे हा एकमेव उपाय आहे. सध्या तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरीकांनी मास्क वापरणे गरजेचे आहे. असेही शेळके म्हणाले. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com