प्रवाशांच्या सोयीसाठी शहरातील नेवासे रस्त्यासमोरील मुख्य टपाल कार्यालयात मार्च 2020मध्ये पासपोर्ट सुविधा केंद्र सुरू केले होते. त्यास तालुक्यासह कोपरगाव, संगमनेर, अकोले, राहाता, औरंगाबाद, नेवासे, राहुरी परिसरातील नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.
श्रीरामपूर ः येथील टपाल कार्यालयातील पासपोर्ट सेवा-सुविधा केंद्र पुन्हा एकदा सुरू झाले. कोरोनामुळे पासपोर्ट सुविधा बंद करण्यात आली होती.
लॉकडाउनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता दिल्यानंतर जनजीवन सुरळीत होत असताना, येथील पासपोर्ट सेवा सुरू झाल्याची माहिती पासपोर्ट विभागाचे अधिकारी प्रसाद तऱ्हाळ यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून पासपोर्ट सेवा देण्याची सूचना केली आहे. पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज करताना, अर्जदाराने आरोग्य सेतू ऍप घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी शहरातील नेवासे रस्त्यासमोरील मुख्य टपाल कार्यालयात मार्च 2020मध्ये पासपोर्ट सुविधा केंद्र सुरू केले होते. त्यास तालुक्यासह कोपरगाव, संगमनेर, अकोले, राहाता, औरंगाबाद, नेवासे, राहुरी परिसरातील नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.
वर्षभरात येथील केंद्रातून साडेआठ हजार नागरिकांनी पासपोर्ट काढल्याचे तऱ्हाळ यांनी सांगितले. पासपोर्टसाठी https://portal1.passportindia.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज करावा.