Pathardi Rain Update: पाथर्डीत पावसाने हाहाकार! 'अनेक गावांचा संपर्क तुटला'; बचाव पथकाकडून १२७ जणांची सुटका

Torrential Rain in Pathardi: अनेक गावांचा आज दुपारपर्यंत संपर्क तुटला होता. तीन रेस्क्यू टीमने मदतकार्य हाती घेत दिवसभरात नागरिकांच्या मदतीने १२७ नागरिकांना पाण्यातून बाहेर काढले, तर काही तरुणांनी सुद्धा आपल्या गावातील अनेकांना पाण्यातून बाहेर काढले.
Pathardi flood rescue: Relief teams save 127 villagers as heavy rains cut off road links.

Pathardi flood rescue: Relief teams save 127 villagers as heavy rains cut off road links.

Sakal

Updated on

पाथर्डी: मागील चोवीस तासांत तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या पावसाने शेतातील उभ्या पिकांच्या नासाडीसह  अनेक घरांची पडझड झाली.   अनेक जनावरे, शेतातील माती पुराच्या पाण्यात वाहून गेली.  माणिक दौण्डी व घाटशिळ पारगाव येथील पुराच्या पाण्यात दोन जण बेपत्ता झाले. अनेक गावांचा आज दुपारपर्यंत संपर्क तुटला होता. तीन रेस्क्यू टीमने मदतकार्य हाती घेत दिवसभरात नागरिकांच्या मदतीने १२७ नागरिकांना पाण्यातून बाहेर काढले, तर काही तरुणांनी  सुद्धा आपल्या गावातील अनेकांना पाण्यातून बाहेर काढले.  उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी आवश्यकता भासल्यास हेलिकॉप्टरची मदत घ्या, असे आदेश प्रशासनाला दिले.  

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com