पाथर्डीत झाले आमदार राजळे यांच्या हस्ते मोफत दूध वाटप

राजेंद्र सावंत
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

महसूल विभागाचे कोणतेही अधिकारी अंदोलकाकडे फिरकले नाहीत. राजळे यांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार नामदेव पाटील यांना मागण्यांचे निवेदन दिले.

पाथर्डी : दुधाला दरवाढ मिळावी रासायनिक खतांची टंचाई दुर करावी , अतिवृष्ठीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई द्यावी आणि संपुर्ण कर्जमाफी करावी या मागण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवारी माळीबाभुगाव येथे राष्ट्रीय महामार्गावर आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली रस्तोरोको अंदोलन केले.

कोणत्याही आश्वासनाशिवाय अंदोलन मागे घेण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, जिल्हा परीषद सदस्य राहुल राजळे,  उपसभापती मनिषा वायकर, गोकुळ दौंड, रविंद्र वायकर, सोमनाथ खेडकर, काकासाहेब शिंदे, नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, अभय आव्हाड, अजय रक्ताटे, भगवान आव्हाड उपस्थित होते.

या वेळी सरकारच्या विरोधत घोषणाबाजी करण्यात आली. अांदोलकासमोर बोलताना आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, दुधाला तीस रुपयापेक्षा जास्त भाव मिळावा. दुधाला प्रतिलिटर दहा रुपये तर दुधाच्या भुकटीला पन्नास रुपये अनुदान द्यावे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे होऊन तात्काळ नुकसान भरपाई मिळावी.

रासायनिक खतांची टंचाई दूर व्हावी. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन निधी द्यावा.

हेही वाचा - राम शिंदे म्हणतात, सरकार म्हणजे एकाच नवऱ्याच्या दोन बायका

भारतीय जनता पक्षाने रस्तोरोको अंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, जिल्हाधिका-यांचे आदेश आहेत रस्ता अडविता येणार नाही. रस्त्याच्या बाजुला उभे राहुन अांदोलन करा असे आवाहन पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी अंदोलकांना केले. आमदार राजळे यांच्या हस्ते मोफत दुध वाटप करुन पंधरा मिनिटामध्ये अांदोलन आवरले.

महसूल विभागाचे कोणतेही अधिकारी अंदोलकाकडे फिरकले नाहीत. राजळे यांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार नामदेव पाटील यांना मागण्यांचे निवेदन दिले.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pathardi, free milk was distributed by MLA Rajale