पंचायत समितीला सांगुनही घेतला सिंगल फेज विजपुरवठा, मग काय होणार

राजेंद्र सावंत
Friday, 30 October 2020

पाथर्डी पंचायत समिती कार्यालयात बसविलेल्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी वीज कंपनीकडून थ्री- फेज वीजपुरवठा घेणे गरजेचे आहे.

पाथर्डी (अहमदनगर) : पाथर्डी पंचायत समिती कार्यालयात बसविलेल्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी वीज कंपनीकडून थ्री- फेज वीजपुरवठा घेणे गरजेचे आहे. पंचायत समितीला सांगूनही तो त्यांनी घेतला नाही. त्यामुळे सिंगल फेज वीजपुरवठ्यावर केवळ कमी प्रमाणात जोडणी द्यावी लागली.

सौरऊर्जेचा फायदा घ्यायचा असल्यास समितीने थ्री- फेज वीजपुरवठा घ्यावा, तरच पूर्ण क्षमतेने सौरऊर्जा संयंत्र चालेल, अशी माहिती सोनकुल एनर्जी प्रॉडक्‍ट्‌सचे संचालक सुमीत सोनवणे यांनी दिली. 

सोनवणे म्हणाले, पाथर्डी पंचायत समितीला आम्ही सौरऊर्जा संयंत्र दिले आहे. त्यासाठी निविदा काढताना सौरऊर्जेसाठी थ्री- फेज वीजपुरवठा लागेल' अशी माहिती दिली होती. 
आम्ही पंचायत समितीला तसे वेळोवेळी सांगितलेही होते व आजही तेच सांगत आहोत.

आम्ही नगर येथून ऍसिडचे पाणी नेऊन टाकले आहे. संयंत्र नादुरुस्त झाले. दुरुस्तीसाठी पुणे येथून तंत्रज्ञ बोलाविले. काही सुटे भाग उपलब्ध न झाल्याने काम थांबले आहे. सौरऊर्जा प्रकल्प चांगला चालावा यासाठी थ्री-फेज वीजपुरवठा मात्र आवश्‍यक आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pathardi Panchayat Samiti took single phase power supply