esakal | कोरोनामुळे डॉक्‍टरांकडून व्हिडिओ कॉलद्वारेच तपासणी; व्हॉट्‌सऍवर औषधाची चिठ्ठी 
sakal

बोलून बातमी शोधा

Patient examination via video call from doctors; Medications on WhatsApp

कोरोना माहामारीची शहरी भागासह ग्रामीण भागात सुरवातीच्या काळात प्रचंड भीती होती. लॉकडाउनच्या काळात कोरोना संकटामुळे अनेक डॉक्‍टरांनी पेशेंट पाहणे बंद केले. तर, अनेकांनी हॉस्पिटल बंद ठेवले होते.

कोरोनामुळे डॉक्‍टरांकडून व्हिडिओ कॉलद्वारेच तपासणी; व्हॉट्‌सऍवर औषधाची चिठ्ठी 

sakal_logo
By
सूर्यकांत वरकड

नगर : गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोरोना माहामारीने थैमान घातले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना रुग्णालायेही असुरक्षित वाटू लागली आहेत. त्यामुळे नगर शहरातील अनेक डॉक्‍टरांनी रुग्णांची व्हिडीओ कॉलद्वारे तपासणी करून व्हॉट्‌सऍपवर औषधे देणे सुरू केले आहे. ही मोहीम गेल्या सहा मान्यांपासून सुरू आहे. 

कोरोना माहामारीची शहरी भागासह ग्रामीण भागात सुरवातीच्या काळात प्रचंड भीती होती. लॉकडाउनच्या काळात कोरोना संकटामुळे अनेक डॉक्‍टरांनी पेशेंट पाहणे बंद केले. तर, अनेकांनी हॉस्पिटल बंद ठेवले होते. त्यामुळे कोरोना वगळता अन्य आजार असणाऱ्यांना रुग्णांना उपचार मिळणे दुरापास्त झाले होते. तर, दुसरीकडे लोकांच्या मनात कोरोनाची प्रचंड भीती असल्याने कोणीही हॉस्पिटलमध्ये जात नव्हते. या काळात अनेक रुग्णांची ससेहोलपट झाली. 

दरम्यान, दुसरीकडे नगर शहरात असणाऱ्या सर्व सुविधांयुक्त हॉस्पिटलमध्ये आता कोविड सेंटर सुरू केले आहे. त्यामुळे पोट, हृदयरोग, मेंदू विकार, मणके विकार, कान, नाक, घसा, डोळे, त्वचारोग असे आजार असणारे रुग्ण कोविड सेंटर सुरू असलेल्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचे धाडस करीत नाहीत.

लहान बाळ आजारी पडल्यानंतर कोरोना भीतीपोटी हॉस्पिटलला कसे जायचे? असा प्रश्‍न नातेवाईकांना पडतो. अशा रुग्णांच्या उपचारासाठी नगर शहरातील डॉक्‍टरांनी फोनवरच औषधे देणे सुरू केले.

व्हिडीओ कॉलद्वारे रुग्ण तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. लहान बाळ आल्यास व्हिडीओ कॉलद्वारे तपासणी करून औषधे दिले जातात. रुग्णांनी डॉक्‍टरांना योग्य माहिती देणे आवश्‍यक आहे. 
 

कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आले होते. परंतु, आम्ही एकही दिवस हॉस्पिटल बंद ठेवले नाही. सर्व नियमांचे पालन करून रुग्णांवर औषध उपचार केले. आता व्हीडिओ कॉलद्वारे बाळाची तपासणी करून औषध उपचार करीत आहोत. कोविड काळात ही सेवा अवरितपणे सुरू राहणार आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी फोनवरच संपर्क साधावा.

- डॉ. अनिरुद्ध धर्मा, बालरोग तज्ञ 
 

कोविडच्या काळात सर्वांनीच काळजी घेतली पोहिजे म्हणून फोनवर रुग्णांशी संवाद साधून औषध उपचार करीत आहोत. मात्र, रुग्णांनी आजाराची अचूक माहिती द्यावी. मोबाईल सारख्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा. जेणे करून डॉक्‍टरांना निदान करणे सोपे जाईल.

- डॉ. राजीव सूर्यवंशी, त्वचारोग तज्ञ 
 

संपादन - अशोक निंबाळकर

loading image
go to top