इंदोरीकरांवरील पीसीपीएनडीटी खटल्याची ६ जानेवारीला तारीख

आनंद गायकवाड
Saturday, 19 December 2020

या खटल्याची पुढील सुनावणी बुधवार ( ता. 06 ) जानेवारी 2021 रोजी होणार असल्याची माहिती अतिरीक्त सरकारी अभियोक्ता अॅड. अरविंद राठोड यांनी दिली आहे.

संगमनेर ः अपत्य जन्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन कीर्तनकार निवृती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्याविरोधात आरोग्य विभागाने पीसीपीएनडीटी ( प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा ) कायद्याचा भंग केल्याचा खटला दाखल केला आहे.

या खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायालयात सुरु आहे. या खटल्यासंबंधी प्रथम वर्ग न्यायादंडाधिकारी यांच्या कोर्टात सादर केलेली मूळ कागदपत्रे जिल्हा सत्र न्यायालयात सादर करण्याची मागणी करणारा अर्ज अतिरीक्त सरकारी अभियोक्ता अॅड. अरविंद राठोड यांनी दिला होता.

या खटल्याच्या आज झालेल्या कामकाजात इंदुरीकरांचे वकील अॅड. के. डी. धुमाळ यांनी सरकारी पक्षाच्या मागणीप्रमाणे कागदपत्रे जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केली. 

हेही वाचा - पारनेरमध्ये कुकडी कालव्याला भगदाड

या खटल्याची पुढील सुनावणी बुधवार ( ता. 06 ) जानेवारी 2021 रोजी होणार असल्याची माहिती अतिरीक्त सरकारी अभियोक्ता अॅड. अरविंद राठोड यांनी दिली आहे.

या प्रकरणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे अॅड. रंजना पगार - गवांदे बाजू मांडीत आहेत. लेखी युक्तिवाद सादर करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PCPNDT case against Indorikar on January 6