
Farmers from KBP and Kisan Sabha rally on Pandharipool Road, demanding revival of the ‘Farmer King’ legacy and agricultural reforms.
Sakal
अमरापूर: अतिवृष्टी आणि पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या न्याय द्या, बळीराजाला पुन्हा उभे करा, अशी मागणी करत भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीने सामनगाव (ता. शेवगाव) येथे शेवगाव-पांढरीपूल रस्त्यावर आज (ता. ९) रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी शासन विरोधी घोषणाबाजी करत नुकसानग्रस्त शेतीला प्रतिहेक्टरी ७० हजार रुपये मदत देण्याची मागणी केली.