येथे जपली जाते अशीही 'भाऊबंदकी'

शांताराम काळे 
Saturday, 9 January 2021

मूळचे गावातील परंतु सध्या पुणे, मुंबई, नाशिक येथे नोकरीनिमित्त गेलेल्या व्यक्तींची नावे ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या मतदार यादीत सामाविष्ट असतात. ही मंडळी आपले भाऊबंद, नातेवाइकांना मतदान करण्यासाठी आवर्जून येतात.

अकोले (अहमदनगर) : भाऊबंदकीमध्ये वादच अनेकदा अनुभवले जातात. आदिवासी भागात मात्र बाहेरगावी कामधंद्यानिमित्त गेलेले लोक मूळ गावातल्या आपल्या भाऊबंदांना निवडून आणण्यासाठी आवर्जून प्रयत्न करतात.
 
मूळचे गावातील परंतु सध्या पुणे, मुंबई, नाशिक येथे नोकरीनिमित्त गेलेल्या व्यक्तींची नावे ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या मतदार यादीत सामाविष्ट असतात. ही मंडळी आपले भाऊबंद, नातेवाइकांना मतदान करण्यासाठी आवर्जून येतात. ग्रामपंचायतीच्या सदस्यपदावर सातत्याने असणाऱ्या व्यक्ती आपल्या बाहेरील नातेवाइकांची नावे मुद्दाम मतदार यादीत समाविष्ट करतात. 

कल्याणमध्ये स्थायिक असणारे चाकरमानी किंवा व्यावसायिक शेती गावाकडे असल्याने, सात-बारा, आठ-अ नावावर असल्याने, त्यांच्या ग्रामपंचायतींमध्ये नोंदी असतात. ती नावे मतदार यादीत घेता येतात. निवडणुकीत आपले नातेवाईक असलेले सदस्यपदासाठी किंवा सरपंचपदासाठी उभे असल्याने, ते मतदानाला आवर्जून येतात व भाऊबंदांना मतदान करतात. त्यामुळे गावागावांतून पाहुण्यांना बोलावून मतदान घडविले जात असल्याची जोरदार चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People who have gone abroad for work try hard to elect their brothers from the original village