कर्जतकर फुल्ल टेन्शनमध्ये...कारण या व्यक्तीला निघाला कोरोना

नीलेश दिवटे
Wednesday, 15 July 2020

तालुक्यात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली आहे. सदर व्यक्ती वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असून त्यास उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे.

कर्जत (अहमदनगर) : तालुक्यात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली आहे. सदर व्यक्ती वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असून त्यास उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे.
राशीन मार्गे कर्जत तालुक्यात कोरोनाने प्रवेश केला. तसेच सिद्धटेक आणि माहिजळगाव गावात याचे लोण पसरले. राशीन येथील वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एका सहा वर्षीय चिमुरडीने कोरोनावर मात केली. काही दिवसात तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नसल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला होता. तालुक्यातील वरील ठिकाणी रुग्ण अढळून येत असले तरी कर्जत शहर मात्र याला अपवाद होते. मात्र शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. तसेच सदर व्यक्तीच्या संपर्कात कितीजण आलेले आहेत. याचा कसून शोध सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामदैवत संत सद्गुरू गोदड महाराज रथयात्रा रद्द असून आजपासून सलग तीन दिवस शहर व तालुक्यात जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे. मात्र कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.
कर्जत शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सदर रुग्णास उपचारासाठी हलविण्यात आले असून त्याच्या संपर्कात कोण कोण आले आहेत याची चाचपणी सुरू आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A person associated with the medical field in Karjat is corona positive