राहाता बाजार समितीत आता पेरू, चिकूचेही लिलाव

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 January 2021

बाजार समितीच्या मोंढ्यावर डाळींबाचे लिलाव घेणा-या व्यापारी व खरेदिदारांना या पेरू व चिकूंची खरेदी करण्याच्या सुचना व्यवस्थापनाने दिल्या.

राहाता ः कांदा आणि डाळिंबाची राज्यातील मोठी अर्थिक उलाढाल असलेली बाजारपेठ असा येथील बाजार समितीचा लौकीक आहे. आजपासून येथे अन्य फळांचे लिलाव देखील सुरू झाले.

आज पहिल्याच दिवशी पेरू व चिकूचे प्रतिकिलो पचंवीस रूपये दराने लिलाव झाले. अवघ्या तासाभरात शेतक-यांच्या तिस लाख रूपये किंमतीच्या फळांची विक्री झाली. नगर जिल्ह्यातील वाढती पेरू व चिकूची लागवड लक्षात घेऊन हा मोंढा सूरू करण्यात आला.

हेही वाचा - नाशिक-पुणे महामार्गावर फुलले ताटवे

पहिल्या दिवशी समाधानकारक भाव मिळाल्याने फळे विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतक-यांनी समाधान व्यक्त केले. पेरू व चिकू सोबत अॅपल बोराची देखील मोठी आवक झाली. त्यास प्रतिकिलो दहा रूपये दर मिळाला. गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकूंद सदाफळ, अॅड.रघुनाथ बोठे, माजी नगराध्यक्ष सोपान (काका) सदाफळ, सभापती भाऊसाहेब जेजूरकर व उपसभापती बाळासाहेब जपे यांच्या उपस्थीतीत आज या फळबाजारास प्रारंभ करण्यात आला. 

बाजार समितीच्या मोंढ्यावर डाळींबाचे लिलाव घेणा-या व्यापारी व खरेदिदारांना या पेरू व चिकूंची खरेदी करण्याच्या सुचना व्यवस्थापनाने दिल्या. त्यांनी सहमती दर्शवून आज पहिल्यांदाच डाळींबा व्यक्तीरीक्त चिकू व पेरूची खरेदी केली. डाळींबाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणा-या उत्तर भारतात आम्ही येथून खरेदि केलेली फळे पाठविणार असल्याचे या व्यापा-यांनी सांगीतले. 

 

काही दिवसांपूर्वी राहाता, कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्यातील पेरू उत्पादकांनी या बाजार समितीचे मार्गदर्शक आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे येथे पेरू व चिकूचा मोंढा सुरू करावा, त्यामुळे डाळींबाच्या मोंढ्या प्रमाणे स्पर्धा निर्माण होऊन चांगला भाव मिळेल. अशी मागणी केली होती. त्यानंतर आमदार विखे पाटील यांच्या सुचनेनंतर आजपासून विविध फळांचे लिलाव सुरू करण्यात आले आहेत. 
- उध्दव देवकर, सचिव बाजार समिती, राहाता, अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Peru and Chiku will also be auctioned at Rahata Bazar Samiti