
Akole police raid in Waranghushi: Illegal petrol-diesel stock seized, two persons booked.
अकोले : अकोले तालुक्यातील वारंघुशी येथे अवैध पेट्रोल व डिझेल साठ्यावर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी छापा टाकत कारवाई केली. या कारवाईमध्ये दोन जणांवर गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. अकोले तालुक्यातील वारंघुशी फाट्यावर एक व्यक्ती चोरीचे पेट्रोल आणून विकत असल्याची माहिती अहिल्यानगर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. सदर पथकाला वारंघुशी फाट्यावर पांडुरंग सदगीर या व्यक्तीच्या घरासमोर प्लास्टिक ड्रममध्ये विक्रीसाठी पेट्रोल व डिझेल आढळून आले.