esakal | अण्णा हजारे यांच्या गावाचाच रस्ता असा असेल तर मग...
sakal

बोलून बातमी शोधा

Pits on Ralegansiddhi to Jategaon Fata road in Parner taluka

राळेगणसिद्धी ते जातेगाव फाटा हा अवघा चार किलोमीटरचा रस्ता आहे. मात्र त्या रस्त्याची अतीशय दुर्दशा झाली आहे. या रस्त्याने साधी दुचाकी चालविणे कठीण झाले आहे.

अण्णा हजारे यांच्या गावाचाच रस्ता असा असेल तर मग...

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : राळेगणसिद्धी ते जातेगाव फाटा हा अवघा चार किलोमीटरचा रस्ता आहे. मात्र त्या रस्त्याची अतीशय दुर्दशा झाली आहे. या रस्त्याने साधी दुचाकी चालविणे कठीण झाले आहे.

तर चारचाकी गाडी चालविणे म्हणजे एक प्रकारे तारेवरची कसरतच आहे. राज्यातच नव्हे तर देशातही आदर्शगाव म्हणून नाव लौकीक मिळविलेल्या राळेगणसिद्धीचाही रस्ता असा खडतर बनला आहे, ही मोठी शोकांतीका आहे.

राळेगणसिद्धी गाव पाहायला जातय तर जरा जपून जा असे पर्यटक व येथे राळेगणसिद्धी येथे येणाऱ्या लोकांना सांगण्याची वेळ अता आसपासच्या तसेच गावातीलही लोकांना आली आहे. सध्या कोरोना माहामारी व लॉकडाऊनमुळे राळेगणसिद्धीला पर्यटक येत नाही. एरवी दररोज हजारो पर्यटक येथे आदर्श गावाची पहाणी करण्यासाठी येतात. येथील जलसंधारण तसेच इतर कामे पाहाण्यासाठी तसेच जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी येतात.

या गावाला जाण्यासाठी असणाऱ्या मार्गाची अतीशय दुर्दशा झाली आहे. नगर- पुणे महामार्गावरून जातेगाव फाटा ते राळेगणसिद्धी हे अंतर सुमारे चार किलोमिटर मात्र त्याची अतीशय अवस्था वाईट झाली आहे.

हजारे यांच्या आदर्श गावाला जाणारा रस्ता असा खडतर झाला आहे. तर इतर तालुक्यातील रस्ते कसे असतील अशी तुलना येणारे पर्यटक करत आहेत. मात्र या रस्त्याच्या दुरूस्तीकडे कोणीच लक्ष देत नाही. यातील राळेगणसिद्धीपासून जातेगावकडे जातानाचा एक किलोमिटरचा रस्ताही चांगाला आहे. मात्र उर्वरीत रस्ता अतीशय खराब झाला आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी होत आहे.

हा रस्ता जिल्हापरीषदेच्या अंतर्गत येत आहे आम्ही या रस्त्याच्या दुरूस्तीचा प्रस्ताव खासदार सुजय विखे, जिल्हापरीषदेच्या तत्कालीन अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील, जिल्हा परीषदेच्या सदस्या राणी लंके, तसेच बांधकाम समितीचे सभापती पंचायत समिती सभापती आदींना बजेटसह दिले आहे. मात्र याकडे कोणीच लक्ष दिले नाही.

- लाभेश औटी, उपसरंपच, राळेगणसिद्धी 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image