esakal | शेवगाव तालुक्यात पावसामुळे रस्त्यांची चाळण
sakal

बोलून बातमी शोधा

Pits on roads in Shevgaon taluka due to rains

जूनपासून झालेल्या पावसाने सर्वच रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांतून मार्ग काढताना वाहनचालकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याने वाहनेच काय; पायी चालणेही कठीण झाले आहे.

शेवगाव तालुक्यात पावसामुळे रस्त्यांची चाळण

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) : तालुक्‍यात जूनपासून झालेल्या पावसाने सर्वच रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांतून मार्ग काढताना वाहनचालकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याने वाहनेच काय; पायी चालणेही कठीण झाले आहे. 

हेही वाचा : भाजपमध्ये पदाधिकारी निवडीमुळे नाराजी; सक्रिय कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेतले नसल्याचा आरोप
शेवगाव शहर व तालुक्‍यातून पाथर्डी, कोरडगाव, तिसगाव, पांढरीपूल, नेवासे, पैठण व गेवराईकडे प्रमुख राज्यमार्ग, तसेच पैठण-पंढरपूर पालखी मार्ग जातो. या सर्व रस्त्यांची जूनपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूर्ण वाताहत झाली आहे. रस्त्यांवर जागोजागी मोठमोठे खड्डे पडून खडी रस्त्यावर पसरली आहे.

पावसाचे पाणी साचून चिखल होत असल्याने, वाहनचालकांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेकदा छोटे-मोठे अपघात घडत आहेत. छोटे वाहन खड्ड्यातच अडकून पडते. पाठीमागून व समोरून येणाऱ्या वाहनांना त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नेवासे, नगर, पांढरीपूल, गेवराई, पैठण, आखेगाव या रस्त्यांची तर खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली असून, संपूर्ण रस्ते खड्ड्यांनी व्यापले आहेत. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image