

Ahilyanagar city set for major transformation under ₹2000 crore development proposal.
sakal
-अरुण नवथर
अहिल्यानगर: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी देशातील प्रमुख नद्यांवरील घाट, मंदिरे, रस्ते, विहिरी आणि बारवांची बांधकामे करून शहर व गावांना नवे रूप दिले. आता त्यांच्याच नावाच्या अहिल्यानगर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी केंद्र सरकारकडे दोन हजार कोटी रुपयांची मागणी केली जाणार आहे. अहिल्यानगर महापालिकेने प्रस्तावही तयार केला आहे. या प्रस्तावास केंद्राची मंजुरी मिळाली, तर अहिल्यानगरच्या विकासाचा अनुशेष भरून निघेल.