महिलांची पर्स ओढणाऱ्या सराईतांना पोलिसांनी 24 तासात केले गजाआड

महिलांची पर्स ओढणाऱ्या सराईतांना पोलिसांनी 24 तासात केले गजाआड

अहमदनगर : शहरातून महिलांची पर्स ओढणाऱ्या सराईत चोरट्यांना तोफखाना पोलिसांनी 24 तासांमध्ये जेरबंद केल आहे. गणेश देविदास नल्ला (वय 23, रा. श्रमिकनगर, सावेडी) आणि शैलेश दत्तात्रय फाटक (वय 20, रा. जिमखाना ग्राउंड समोर, एम.आय.डी.सी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सावेडीतील गुलमोहर रस्त्यावर ओम स्वीटच्या पाठीमागे ता. 7 डिसेंबर रोजी पांढऱ्या रंगाच्या मोपेड दुचाकीवरील दोन चोरट्यांनी एक महिलेच्या सायकल हॅन्डल जवळ लावलेली पर्स बळजबरीने ओढली होती. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान सोळंके, हवालदार दत्तात्रय जपे, पोलिस नाईक शैलेश गोमसाळे, अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, अहमद इनामदार, कॉन्स्टेबल धीरज खंडागळे, चेतन मोहिते यांना आरोपींचा शोध घेत असताना गुन्ह्यातील वर्णनाचे आरोपी व वापरलेल्या वाहनासारखे वाहन एम.आय.डी.सी येथे जिमखाना ग्राउंड जवळ बसलेल्या तरुणांकडे असल्याची माहिती मिळाली.

महिलांची पर्स ओढणाऱ्या सराईतांना पोलिसांनी 24 तासात केले गजाआड
कोरोनावर प्रभावी 2 औषधे, एका संशोधनात बाब समोर | Coronavirus

सदर भागात सापळा लावून दोघांना शिताफीने पकडून गुन्ह्या संदर्भात अधिक माहिती घेतली असता, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. शैलेश फाटक याच्याकडे पांढऱ्या रंगाची मोपेड दुचाकी (एम.एच 14 एफपी 1502) या बाबत अधिक विचारपूस केली असता ती आनंदरऋषी रुग्णालयापासून चोरल्याचे सांगितले. त्यांच्याकडे आणखी चौकशी केली असता तीन चोरीचे मोबाईल आढळून आले. आरोपी गणेश नल्ला (वय,23) याने वेगवेगळ्या ठिकाणी चार चोऱ्या केल्याची कबुली दिली.

महिलांची पर्स ओढणाऱ्या सराईतांना पोलिसांनी 24 तासात केले गजाआड
सोमवारपर्यंत कामावर या; निलंबन मागे घेणार, परिवहन मंत्र्यांची घोषणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com