
गेल्या महिन्यात गोमांस टेम्पोचा पाठलाग केल्यावरून पोलिस व्हॅन चालक व अरविंद जोंधळे यांच्यात झालेल्या संभाषणाची चालकावर गुन्हा दाखल झाल्यावर त्याने ती क्लिप माध्यमांना देऊन व्हायरल केली.
अकोले (अहमदनगर) : येथील व्हायरल किल्प प्रकरणात पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे यांची राजकीय दबाव वाढल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी अखेर बदली केली आहे. एका कॉन्स्टेबलवर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात गोमांस टेम्पोचा पाठलाग केल्यावरून पोलिस व्हॅन चालक व अरविंद जोंधळे यांच्यात झालेल्या संभाषणाची चालकावर गुन्हा दाखल झाल्यावर त्याने ती क्लिप माध्यमांना देऊन व्हायरल केली. त्यात अकोले पोलिस इन्स्पेक्टर व आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यात संबंध ताणले गेल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक यांना सातत्याने पाठपुरावा करून अरविंद जोंधळे यांची बदली करण्याची मागणी केली. तर पत्रकार राजेंद्र आंबरे, विजय पानसरे यांनी बदली व चौकशी करण्याची मागणी थेट मुख्यमंत्री यांच्याकडे केली.
याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी शुक्रवारी रात्री संगमनेर पोलिस स्टेशनला पूर्वी कार्यरत असलेले अभय परमार यांची अकोले पोलिस स्टेशनला बदली करून जोंधळे यांना कार्यमुक्त केले आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले