esakal | मोबाईलवर मेसेज पाठवून तलाक; पतीसह सासरच्या चौघांविरोधात गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

police case filled against man giving talaq to wife over phone

मोबाईलवर मेसेज पाठवून तलाक; पतीसह सासरच्या चौघांविरोधात गुन्हा

sakal_logo
By
टीम-ईसकाळ


अहमदनगर : मोबाईलवर मेसेज पाठवून बेकायदेशीर तलाक (घटस्फोट) देऊन घराबाहेर काढल्याबद्दल पतीसह सासरच्या चौघा जणांविरुद्ध विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिंगार उपनगरात ही घटना घडली असून कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


खालेद ख्वाजा सय्यद याच्या भिंगारमधील तरुणीचा २०१७ मध्ये मुस्लिम धर्मानुसार विवाह झाला होता. पतीला स्टेट बॅंकेत परमनंट नोकरीसाठी सासरच्या लोकांनी १५ लाखांची मागणी केली. तरुणीच्या वडिलांनी विवाहाच्या वेळेस तीन लाख आणि नंतर दोन लाख असे एकूण पाच लाख रुपये दिले होते. सासरच्या नातेवाईकांनी राहिलेल्या पैशासाठी छळ सुरू केला. कौटुंबिक वाद मिटविणाऱ्या पोलिस दलाच्या भरोसा सेलमध्ये सामोपचाराने वाद मिटविण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा छळ सुरू केला. पतीने ता.२६ ऑगस्ट रोजी मोबाईलवर तलाक असा मेसेज पाठवून बेकायदेशीर तलाक दिला. त्यानंतर घरातून बाहेर काढले. या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार पोलिस ठाण्यात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: जायकवाडीचा पाणीसाठा ४३ टक्क्यांवर; यंदा धरण भरण्याची शक्यता कमीच

loading image
go to top