esakal | कर्जत येथे जमीन लिहून घेणाऱ्या सावकारावर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

crime

कर्जत येथे जमीन लिहून घेणाऱ्या सावकारावर गुन्हा

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

कर्जत (जि. नगर) : व्याजाने दिलेले दोन लाख रुपये व व्याज परत केले नाही म्हणून २५ लाखांची जमीन लिहून घेणाऱ्या सावकाराविरुद्ध कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंडलिक छगन सुपेकर (रा. मिरजगाव) यांच्या फिर्यादीवरून सुखदेव दिनकर केदारी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (police case registered against the lender at Karjat)

पोलिस सूत्रांनी माहिती दिली की, मिरजगाव येथील कुंडलिक सुपेकर यांनी २०१५मध्ये संदीप (पूर्ण नाव समजले नाही) या व्यक्तीच्या माध्यस्थीने सुखदेव केदारी याच्याकडून दोन लाख रुपये व्याजाने घेतले. त्याबदल्यात २० गुंठे जमीन संदीपच्या नावे करून दिली. त्यानंतर सुपेकर यांना वेळेवर व्याज देणे जमले नाही. त्यामुळे केदारीच्या मागणीवरून संदीप याच्या नावे असलेले क्षेत्र केदारीच्या पत्नीच्या नावे करण्यात आले. सुपेकर यांनी केदारी याची सर्व रक्कम परत केली. मात्र, जमीन परत देण्यासाठी २५ लाख रुपये द्यावे लागतील, तसेच २० गुंठ्यांतील दोन गुंठे क्षेत्र माझ्या नावे करून द्यावे लागेल, अशी अट त्याने घातली. सुपेकर यांनी सावकार सुखदेव केदारी, त्याची पत्नी छायाबाई केदारी याच्यासह इतरांविरोधात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: अहमदनगर जिल्हा परिषदेत बदल्या फक्त नावालाच!

कोणाला सावकारांकडून त्रास होत असल्यास न घाबरता पोलिसांशी संपर्क करावा. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवून सावकारांवर कारवाई करण्यात येईल.

- चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक, कर्जत

(police case registered against the lender at Karjat)

हेही वाचा: कोपरगावात राजेंद्र खिलारींचा समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश

loading image