
अहिल्यानगर : कोतवाली पोलिसांनी आज दुपारी साडेतीनच्या सुमारास चार गन, दोन मॅग्झिन व ३४ जिवंत काडतुसांसह दोघांना ताब्यात घेतले आहे. शहरातील क्लेरा ब्रुस मैदानावर ही कारवाई करण्यात आली. रोहन राजू गाडे (वय ३०, रा. अपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे, मूळ रा. गाडेवाडी, ता. मुळशी, जि. पुणे) व नवनाथ अंकुश देणे (वय २९, रा. सुरभी कॉलनी रोड, आपटे सोसायटी, वारजे माळवाडी, ता. हवेली, जि. पुणे) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.