Ahmednagar News : कोयत्याचा धाक दाखवणारा अटकेत

चार जणांच्या टोळीने कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादीकडील ११ हजारांची रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता.
crime
crime esakal

Ahmednagar News - कोयत्याचा धाक दाखवून व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दोघा जणांना लुटणाऱ्या टोळीतील एका आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले. अभिषेक विजय मोढवे (रा. अंबिका चौक, वाकोडी फाटा, सोलापूर रस्ता, नगर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

crime
Nagar Crime: शाळकरी मुलीचा विनयभंग, पीडित मुलीने पोलिसांकडे तक्रार देताच आरोपी...

बुरुडगाव रस्त्यावरील नक्षत्र लॉन येथे रात्री मालवाहू टेम्पो घेऊन जाणाऱ्या दोघांना मारहाण करत लुटल्याची घटना घडली होती. चार जणांच्या टोळीने कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादीकडील ११ हजारांची रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता.

तपास सुरू असताना गुन्ह्यातील आरोपीचे नाव निष्पन्न झाले. कोतवाली पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, न्यायालयाने ४ दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यातील इतर तीन आरोपींचा शोध सुरू आहे.

crime
Ahmednagar : ‘सीना’त पाणी येऊनही शेतकरी वंचित राहणार

पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अश्विनी मोरे पोलिस नाईक संदीप पितळे, तानाजी पवार, सत्यजित शिंदे, दीपक रोहोकले यांनी ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com