अवैध दारू कारखान्यांवर पोलिसांची छापा घालून कारवाई

गौरव साळुंके 
Saturday, 26 December 2020

नाताळ व नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी शहरात कारवाई केली.

श्रीरामपूर (अहमदनगर) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने येथील गोंधवणी परिसरासह सरस्वती कॉलनी, कदमवस्ती, सूतगिरणी परिसरात छापे टाकून गावठी दारू निर्मितीच्या रसायनासह एकूण चार लाख 87 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 

हे ही वाचा : माथाडी कामगारांना पाच लाखांची विमा सुरक्षा

नाताळ व नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी शहरात कारवाई केली. यावेळी प्रभाकर गायकवाड, माणिक शिंदे, कचरू गायकवाड (फरार) (सर्व रा. गोंधवणी), उषा काळे, चंद्रकांत पवार (रा.कदमवस्ती), साधना काळे, वंदना काळे (रा. सूतगिरणी परिसर), इंदुबाई जाधव, मीना माने (रा. सरस्वती कॉलनी) यांच्याकडून स्पिरीट, गावठी दारू, रसायन, काळा गुळ, नवसागर, रसायन आणि भट्टी बॅरल, प्लास्टिक कॅनसह दोन दुचाक्‍या असा एकूण चार लाख 87 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हे ही वाचा : नवविवाहीतेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासू सासऱ्यावर गुन्हा 

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस. एम.सराफ, ए. बी. बनकर, एस. के. कोल्हे, बी.बी.हुलगे, आर.डी.वाजे, पी.बी.आहिरराव यांच्या पथकाने केली.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police have raided illegal liquor factories in Shrirampur