
अहमदनगर : बुलडाणा (buldana) जिल्ह्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भानुदास कांबळे यांच्या खासगी वाहनावर अरणगाव (ता. जामखेड) येथे जमावाने चोर असल्याच्या संशयातून खुनी हल्ला (attack) केला होता. त्यांनी प्रसंगावधान राखून जीव वाचविला. या गंभीर गुन्ह्यात जामखेड पोलिस आरोपींना अटक करत नाहीत. पोलिसांच्या या कार्यपद्धतीला पोलिस अधिकाऱ्याच्याच पत्नीने आक्षेप घेतला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण कांबळे यांची पत्नी ऍड. पूनम यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली आहे. त्यांना निवेदन दिले आहे. जामखेड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदविला आहे. पोलिसांना आरोपींची नावे देऊनही अटक करत नाहीत, महत्वाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याकडे दुर्लक्ष, पंचनाम्यातील त्रुटींकडे लक्ष वेधले आहे.
सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याकडे दुर्लक्ष
पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या कुटुंबीयांना गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी आष्टी येथील भगवान टिंबर मर्चंटस् या दुकानातून ता.१७ जुलै रोजी बांबू व बल्ल्या खरेदी केल्या आहेत. ता.१९ जुलै रोजी प्रगती स्टील सेंटरमधून नेट कापड खरेदी केले आहे. ता. २३ रोजी कोंबडी जाळी खरेदी केली. धनाश्री पतसंस्थेची पावती २९ रोजी आहे. कोंबडी पालनासाठीचे साहित्य खरेदी केले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक असलेले पती किरण कांबळे, दीर विशाल, चुलते व भाऊ हे ता.६ ऑगस्ट रोजी कोंबड्यांची पिल्ले आणण्यासाठी अरणगाव (ता. जामखेड) येथे सायंकाळी पावणे पाच वाजता इंडिगो कार (एमएच ६ एएफ ५५०३) मधून गेले होते. त्यावेळेस तेथील जमावाने संशयातून या वाहनावर दगडफेक करून हल्ला केला. वाहनातून बाहेर ओढून जबर मारहाण केली. काहींनी या घटनेचे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केले. जामखेड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जमावावर खुनी हल्ला करणे, दंगल करणे, धमकावणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची घटना काही आरोपींना आपल्या मोबाईलवरून व्हायरल केली होती. तरीही तपासणी अधिकाऱ्यांनी संबंधित मोबाईल जप्त केले नाही. हे मोबाईल जप्त करावेत. अरणगाव बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. हे रेकॉडिंग ताब्यात घेतलेले नाही. या हल्ल्यातील आरोपींची नावे जामखेड पोलिसांना देऊनही ते आरोपींना अटक करत नाही आदी आक्षेप घेतले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.