

Ahilyanagar Crime
Sakal
अहिल्यानगर: राहुरी तालुक्यात दहशत निर्माण करून वाळू तस्करी करणारी चार जणांची लाटे टोळी जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आली आहे. दहशत, महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे, अतिक्रमण करुन मारहाण करणे, बेकायदा शासकीय वाळूची तस्करी करणे, असे अनेक गंभीर गुन्हे या टोळीने केले होते. राहुरी पोलिसांनी या टोळीच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे सादर केला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.