

Local crime branch officials raid an illegal gas refilling center at Chichondi Patil, Solapur — several cylinders seized in the operation.
Sakal
अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिचोंडी पाटील (ता. अहिल्यानगर) येथे गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस टाक्यांचा साठा जप्त केला आहे. घरगुती गॅस टाक्यांचा बेकायदेशीरपणे साठा करून त्यांचे रिफिलिंग करून व्यावसायिक वापरासाठी विक्री केली जात होती. कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले असून ३३ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.