

Police rescuing the minor girl from the railway tracks before any mishap, reason revealed during inquiry.
Sakal
राहुरी : एका अल्पवयीन मुलीने नैराश्य आल्याने राहते घर सोडले. मुलगी दिसेनासी झाल्याने आई-वडिलांनी पोलिस ठाणे गाठले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. तपासाची चक्रे फिरली. रेल्वे रुळाजवळ विमनस्क अवस्थेत बसलेल्या या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले. अवघ्या दोन तासांत मुलीला पालकांच्या स्वाधीन केले. त्यामुळे मुलीच्या पालकांचा जीव भांड्यात पडला.