
अहिल्यानगर : मार्केट यार्ड परिसरात सुगंधी तंबाखू व गुटखा विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन लाख ९९ हजार ७१२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शरद अर्जुन पवार (वय ३०, रा. जाम, पोस्ट कौडगाव, ता. नगर) असे या आरोपीचे नाव आहे.