esakal | अहमदनगर : पत्रकार हत्या प्रकरणातील आरोपीचे पलायन; पोलिसांचे निलंबन
sakal

बोलून बातमी शोधा

police

पत्रकार हत्या प्रकरणातील आरोपीचे पलायन; पोलिसांचे निलंबन

sakal_logo
By
गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : राहुरी येथील पत्रकार हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी जिल्हा रुग्णालयातून पळून गेल्याने एकच खळबळ माजली. या प्रकरणी दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केली.

आरोपी होता रुग्णालयात दाखल

राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी सुरवातीला तीन जणांना अटक केली होती. या घटनेतील मुख्य आरोपी कान्हू मोरे याला महिनाभरानंतर पोलिसांनी अटक केली होती. मोरे याला अटक केल्यानंतर, काही त्रास जाणवू लागल्यामुळे त्याला अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच तो जिल्हा रुग्णालयातून पोलिसांची नजर चुकवून पळून गेला होता.

हेही वाचा: नेवाशात मुद्रांकांची कृत्रिम टंचाई! नागरिकांची होतेय गैरसोय

आरोपीचे पलायन; दोन पोलिसांचे निलंबन

राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी जिल्हा रुग्णालयातून पळून गेल्याप्रकरणी दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केली. पोलिस नाईक भगवान किसन पालवे, पोलिस शिपाई गणपत जयवंत झरेकर, अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत.

हेही वाचा: अहमदनगर शहरातील रस्ते होणार चकाचक!

loading image
go to top