

Controversy over Ahilyanagar ward formation; report sought by Urban Development Department amid political allegations.
Sakal
अहिल्यानगर: मुदत संपून चार दिवस उलटले, तरी अद्याप अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावण निर्माण झाले आहे. यासंदर्भात शिवसेनेचे (ठाकरे गट) शहर प्रमुख किरण काळे व सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जाची राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. अंतिम प्रभाग रचनेप्रकरणी तत्काळ सविस्तर अहवाल सादर करा, असे आदेश निवडणूक आयोगाने नगरविकास विभागाला दिले आहेत.