
पाथर्डी: शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जावी, शेतमालाला हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांच्या बेरोजगार मुलांना काम मिळावे, महिलांना रोजगारांच्या नवनव्या संधी दिल्या गेल्या पाहिजेत. विचारांची लढाई आम्ही लढत आहोत. संभाजी ब्रिगेड ही लढाई निकराने लढेल, असे मत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी व्यक्त केले. शासकीय विश्रामगृहावर आयोजित बैठकीत ते बोलत होते.