
Women take center stage in Newasa as majority of ZP seats reserved for female candidates.
Sakal
सोनई: नेवासे पंचायत समितीसाठी चौदा पैकी सात जागांवर महिलांचे आरक्षण निघाले, तर जिल्हा परिषदे करीता तालुक्यातील सात जागांकरीता सर्वाधिक पाच जागांवर महिलांचे आरक्षण निघाल्याने महायुती व महाविकास आघाडीकडून गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या अनेक संभाव्य उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले आहे. अनेक गण आणि गटांत महिलांचे आरक्षण निघाल्याने मातब्बर उमेदवारांना आपल्या पत्नींना पुढे करण्याची वेळ येणार असल्याचा बाका प्रसंग आला आहे.