
शिर्डी : राजकीय नेत्यांना ब-याचदा जसा देश तसा वेष या उक्तीचे पालन करण्याची वेळ येते. ते या उक्तीचे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने पालन करतात. वेषांतर झाले की चाहते त्यांच्या सोबत तेवढ्याच उत्साहाने फोटोसेशन करतात. हा वेशभूषा बदललेला फोटो समाजमाध्यमांद्वारे व्हायरल केला जातो. सध्या विठुरायाच्या भेटीला निघालेल्या दिंड्यांनी जिल्ह्यातील रस्ते गजबजून गेलेत. या दिंड्यांच्या स्वागत प्रसंगी वारक-यांच्या वेषातील प्रमुख नेत्यांचे फोटो देखील समाजमाध्यमांतून झळकत आहेत.