'मुळा'च्या व्यासपीठावर रंगली मतभेद आणि मनभेदची चर्चा

In Parner, the money allotted to the voters is being recovered
In Parner, the money allotted to the voters is being recovered

सोनई (अहमदनगर) : जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या उपस्थितीत मुळा कारखान्यावर झालेल्या सन्मान मेळाव्यात शनिशिंगणापूर गावातील राजकारणाचा पाढा वाचण्यात आला. मतभेद आणि मनभेद चर्चेतून साधलेल्या एकोप्यातून अखेर साडेसातीचं ग्रहण सुटलं.

'मुळा' च्या व्यासपीठावर प्रथमच शनिशिंगणापूर येथील विश्वस्त मंडळ व ग्रामपंचायत सदस्य मांडीला मांडी लावून बसले होते. अनेक वर्षापासून गावातील दोन गटाचे तोंड दोन दिशेला होते. येथील राजकारणाचे पडसाद तालुक्यात उमटत होते. येथील दोन्ही गटाला एकत्र आणण्याची किमया जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शक्य करत त्यांना एका व्यासपीठावर आणले.

सन्मान मेळावा तालुक्याचा असतानाही चर्चा फक्त शनिशिंगणापुरचीच अधिक झाली. गावपुढारी बाळासाहेब बोरुडे यांनी आम्ही काही वर्ष भरकटलो होतो. नको त्याच्या मागे फिरुन गावाचे नुकसानच झाले. आता आम्ही सर्व मनाने गडाखांचा हात हातात धरला आहे. ही साथ आता सुटणार नाही असे सांगितले. हाच धागा पकडून जेष्ठ नेते गडाख यांनी मतभेद झाले असतील पण आम्ही कधी मनभेद करत नसल्याचे भाषणात सांगितले. 

जलसंधारण मंत्री गडाख यांनी भाषणाच्या सुरवातीला मी शिंगणापूरबद्दल सविस्तर बोलणार असे सांगत गावासाठी केलेल्या कामाचा पाढा वाचला. ज्यांनी अडचणी आणल्या त्यांचा समाचार घेतला. गावाचं गावपण जपत आतापर्यंत काम केले. शनैश्वर देवस्थान विश्वस्त निवडीकरीता गावातील मूळ रहिवासीच विश्वस्त होणार अशी पूर्वीचीच घटना कायम करण्यासाठी मोठा आटापिटा केल्याचे सांगितले. या एकजूट संवादाचे उपस्थितांनी टाळ्या वाजून स्वागत केले.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com