

Quality Issues in Highway Construction: Protesters Vow to Stop Work if Demands Ignored
Sakal
निघोज : गव्हाणेवाडी ते बेल्हे राष्ट्रीय महामार्गाच्या (क्र.७६१) दिरंगाई व निकृष्ट कामाच्या विरोधात निघोज परिसरातील ग्रामस्थांनी आज रास्तारोको आंदोलन केले. दोन तास सुरू असलेले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र यावेळी आंदोलकांनी प्रशासनाला रोखठोक इशारा दिला. आमच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास काम ठप्प ठेवणार, काम करू देणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला.