Vikhe Patil : दहशत खपवून घेणार नाही

राधाकृष्ण विखे पाटील; संगमनेरमध्ये विरोधकांना इशारा
Vikhe Patil
Vikhe Patilsakal

संगमनेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची छायाचित्रे असलेले फलक फाडले, तरी जनतेच्या मनातून त्यांची प्रतिमा पुसली जाणार नाही. तालुक्यात यापुढे दहशतीचे राजकारण चालणार नाही. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही संघटीतपणे अन्यायाविरोधात आवाज उठवावा. सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असा विश्‍वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.

दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील तळेगाव दिघे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांचे फोटो असलेले फलक फाडण्यात आले होते. त्यानंतर वाद होऊन भाजपचे कार्यकर्ते रामदास दिघे यांच्या घरावर हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विखे पाटील यांनी दिघे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून दहशतीच्या राजकारणास तुम्ही घाबरू नका, परिस्थिती आता बदलली आहे. संघटीतपणे मुकाबला करा, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही दिली.

तळेगाव आणि पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निर्माण केलेल्या दहशतीचा समाचार घेऊन टीका केली. या भागाला वर्षानुवर्षे केवळ आश्वासने देवून झुलवत ठेवले. निळवंडे धरणाचे श्रेय घेणारे भोजापूरच्या पाणी प्रश्नावर बोलायला तयार नाहीत. केवळ ठेकेदारांच्या जीवावर राजकारण करुन दहशत निर्माण करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

भाजप किसान आघाडीचे प्रमुख सतीश कानवडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शैलेश फटांगरे, हरिश्चंद्र चकोर, अमोल खताळ, शरद गोर्डे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. स्थानिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

‘शिवसेनेने आत्मपरीक्षण करावे’

शि वसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह व पक्षाचे नाव निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर, उध्दव ठाकरे गटाचे नेते केंद्र सरकारवर हस्तक्षेपाचा आरोप करीत आहेत. केंद्र सरकारवर आरोप करण्यापेक्षा त्यांनी आत्मपरिक्षण करावे, असा सल्ला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी ठाकरे गटाला दिला आहे. तालुक्यातील घारगाव येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

राधाकृष्ण विखे म्हणाले, की केंद्र सरकारवर आरोप करण्यापलीकडे त्यांच्याकडे काय शिल्लक उरले आहे. त्यांनी जनाधार गमावला, सरकार गमवलं, त्यांनी आता स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. राहिलेले जे काही थोडेफार संघटन आहे, ते कसे टिकवता येईल यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. दुर्दैवाने आतापर्यंत त्यांना चुकीचे सल्लागार मिळाले होते. त्यांचे प्रवक्ते बेताल विधाने करीत होते. सत्याचा विजय होतोच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दृष्टीने हा फार मोठा विजय असून, पक्षचिन्ह व नाव गमावणे हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा नैतिक पराभव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com