
Prajakta Tanpure addressing media about upcoming agitation over unregulated heavy traffic.
Sakal
राहुरी : पोलिस प्रशासनाचा पैसे घेऊन आमच्या जिवाशी खेळ चालू आहे काय? शे-पाचशे रुपयांत आमच्या जिवाची किंमत करता काय? अशा संतप्त भावना व्यक्त करून, अवजड वाहतूक बंद झाली नाही, तर उद्या पुन्हा मोठे जनआंदोलन उभारले जाईल. त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलिस प्रशासनाची राहील. आमच्यावर गुन्हे दाखल केले, जेलमध्ये टाकले तरी मागे हटणार नाही, असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला.